www.24taas.com, वृत्तसंस्था, नवी दिल्ली
गर्भवतीने केलेल्या आहारानुसार पोटातल्या बाळाची बुद्धिमत्ता, वर्तणूक आणि स्वभाव हे निश्चित होत असतात, असा निष्कर्ष अमेरिकेतल्या एका संस्थेने प्रयोगाअंती काढला आहे.
गर्भवतींच्या आहारामध्ये जीवनसत्त्व ब, फॉलिक अॅसिड, आयर्न, आयोडीन यांचा अंतर्भाव केला असता त्यांचे निरनिराळे परिणाम मुलावर कसे होत असतात, याचे प्रदीर्घकाळपर्यंत निरीक्षण करण्यात आले. या मुलांच्या वर्तणुकीचा जन्माच्या दिवसापासून नवव्या वर्षापर्यंत अभ्यास करण्यात आला. प्राध्यापक क्रिस्तिना कंपाय यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी न्यूट्रीमेंट हा संशोधन कार्यक्रम विकसित केला असून त्यानुसार निरीक्षणे केली आहेत.
मुलाच्या मेंदूवर होणारे परिणाम हे एखादे दुसर्यान निरीक्षणावरून ताडता येत नाहीत. कारण मेंदूचा विकास सावकाश होत असतो आणि त्याच्यावर होणारे परिणाम अभ्यासणे हा अतिशय गुंतागुंतीचा विषय असतो.
त्यामुळे पहिल्या दिवसापासून नवव्या वर्षापर्यंत निरीक्षणे करण्यात आली. मुलांच्या वर्तणुकीवर आणि स्वभावावर गर्भावस्थेतील आहाराशिवाय पालकांचे शिक्षण, शैक्षणिक, आर्थिक स्तर, मुलांच्या जन्माच्या वेळी आई आणि वडिलांचे वय याही गोष्टीचे परिणाम होत असतात, असेही त्यांच्या निरीक्षणातून दिसून आले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.