अरेरे! परदेशी महिलांची ही विचित्र फॅशन तुम्हाला आवडेल का?

मेकअप ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना वेड लावते. याच मेकअपच्या नादात काही लोक काय करतील आणि काय नाही याचा कोणालाही काहीच नेम नसतो.  मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, हेअर स्टाईल करणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक गोष्टींची फॅशन करून आपण नेहमीच सगळ्यांमध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो. 

Updated: Dec 12, 2014, 09:41 PM IST
अरेरे! परदेशी महिलांची ही विचित्र फॅशन तुम्हाला आवडेल का? title=

मुंबई : मेकअप ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना वेड लावते. याच मेकअपच्या नादात काही लोक काय करतील आणि काय नाही याचा कोणालाही काहीच नेम नसतो.  मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, हेअर स्टाईल करणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक गोष्टींची फॅशन करून आपण नेहमीच सगळ्यांमध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो. 
अंगभर गोंदवणे ओठ किंवा जीभ टोचून घेणे यांसारखे चित्र-विचित्र फॅशन देखील काहीजण करतात. फॅशनचे हे भूत सतत बदलत असते. क्वचित प्रसंगी त्यात नाविन्यपूर्ण फॅशनची भरदेखील पडते. पुढे अनेकजण त्याचा स्वीकार करतात दिसतात. 
हल्लीच असाच एक चित्रविचित्र प्रकार काहीजण करताना दिसत आहेत.

बगलेतील केस रंगविण्याची एक अनोखी फॅशन हल्ली पाहायला मिळत आहे. खरतर स्लिव्हलेस कपडे घालण्यासाठी स्त्रिया बगलेतील केस काढतात. परंतु, काही धाडसी स्त्रियांनी त्यांच्या  बगलेतील केस वाढवून त्यांना गुलाबी, हिरव्या निळ्या आणि लाल रंगासारख्या गडद रंगांनी रंगाटले आहे. या धाडसी महिला रंगीत केस असलेल्या आपल्या बगलेची छायाचित्रे सेल्फीद्वारे सोशल मिडीयावर पोस्ट करत आहेत, हे फोटो सगळ्यांचेच लक्ष वेधून घेणारे आहेत. तुम्हाला सुध्दा ही विचित्र फॅशन करायला आवडेल का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.