...तर ‘मूत्राशयाचा कँसर’ होऊ शकतो कमी

फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी होवू शकतो, असा निष्कर्ष काढलाय अमेरिकेतल्या अभ्यासकांनी. संयुक्त राज्य अमेरिकेतल्या संशोधकांनी आपल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केलीय की, ज्या महिला फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खातात त्यांना मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी असतो.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 26, 2013, 02:13 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन
फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खाल्ल्यानं मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी होवू शकतो, असा निष्कर्ष काढलाय अमेरिकेतल्या अभ्यासकांनी. संयुक्त राज्य अमेरिकेतल्या संशोधकांनी आपल्या अभ्यासात ही बाब स्पष्ट केलीय की, ज्या महिला फळं आणि भाज्या जास्त प्रमाणात खातात त्यांना मूत्राशयाच्या कँसरचा धोका कमी असतो.
न्यूज एजेंसी सिंहुआच्या रिपोर्टनुसार संशोधकांनी १ लाख ८५ हजार ८८५ प्रौढ व्यक्तींच्या साडेबारा वर्षांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या ‘जर्नल ऑफ न्यूट्रीशन’च्या डेटाचा अभ्यास केला आणि तो हवाई विद्यापीठला सांगितला.
मूत्राशयाच्या कँसरनं ग्रस्त असलेल्या १५२ महिला आणि ४२९ पुरुषांचं निदान करण्यात आलं. अभ्यासानुसार हे समोर आलं की, ज्या महिलांनी फळं आणि भाज्यांचं जास्त प्रमाणात सेवन केलंय, त्यांना मूत्राशयाच्या कँसरचा धोका सगळ्यात कमी आहे.
संशोधकांनुसार पिवळ्या आणि केशरी भाज्यांचं अधिक सेवन करणाऱ्या महिलांमध्ये या कँसरचं प्रमाण ५२ टक्क्यांनी कमी होतं. या कँसरचा धोका कमी करण्यासाठी जेवणात व्हिटॅमिन ए, सी आणि ‘ई’चं प्रमाण जास्त असावं, असा सल्ला यात संशोधकांनी दिला.
मात्र अभ्यासात हे सुद्धा दिसून आलं की, फळ-भाज्या सेवनाचा पुरुषांमधील मूत्राशयाच्या कँसरवर काही परिणाम होत नाही. हवाई विद्यापीठातल्या कँसर विभागाचे हे संशोधक सोंग-यी पार्क म्हणाले, “आमच्या अभ्यासानुसार कँसरच्या प्रतिबंधासाठी आम्ही फळं आणि भाज्यांचं सेवन करण्याची शिफारस करतो”. शिवाय यामागचं कारण नेमकं काय आहे, याबाबतचा शोध आम्ही घेत आहोत, असंही पार्क यांनी स्पष्ट केलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.