www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
दररोज आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना लावण्यात येणाऱ्या सुगंधित अगरबत्तीनं आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार दररोज अगरबत्ती लावणाऱ्या घरांमधली हवा प्रदूषित होते. त्यामुळं फुफ्फुसांचा पेशींना सूज येऊ शकते.
अमेरिकेतल्या चॅपल हिल इथल्या उत्तर कॅरोलिना विद्यालयातील गिलिंग्स स्कूल ऑफ ग्लोबल पब्लिक हेल्थमध्ये नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, अगरबत्ती जाळल्यानं कार्बन मोनोक्साईड सारख्या प्रदूषण वाढवणाऱ्या वायूंचं उत्सर्जन होतं. ‘सायंस ऑफ द टोटल एन्वायरमेंट’ या पर्यावरण शोध पत्रिकेत ऑगस्ट २०१३मध्ये हे शोधपत्र प्रकाशित झालंय.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात श्वसन रोगामुळं दरवर्षी जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होतोय. याचं मुख्य कारण स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या उघड्या स्टोव्हमधून निघणारे प्रदूषणकारक गॅसेस हे आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.