कन्या – पैशाप्रमाणे आपले जीवनमान आहे.

कन्या राशीच्या व्यक्तींना या वर्षात चांगला अनुभव प्रत्ययाला येईल. हे वर्ष चांगल्या गोष्टींबरोबर आपल्याला चांगली सफलता मिळेल. या सालात आपल्याला भरभराट होईल. त्यादृष्टीने थोडेसे प्रयत्न यात अधिक भर घालील. आर्थिकबाबतीत हे वर्ष तेजीचे आहे. आपल्या काही योजनांना अधिक विकसित होण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Updated: Jan 4, 2012, 05:43 PM IST

कन्या राशीच्या व्यक्तींना या वर्षात चांगला अनुभव प्रत्ययाला येईल. हे वर्ष चांगल्या गोष्टींबरोबर आपल्याला चांगली सफलता मिळेल. या सालात आपल्याला भरभराट होईल. त्यादृष्टीने थोडेसे प्रयत्न यात अधिक भर घालील. आर्थिकबाबतीत हे वर्ष तेजीचे आहे. आपल्या काही योजनांना अधिक विकसित होण्यासाठी प्रेरणा मिळेल.

 

पहिल्या सहा महिन्यात सर्वचबाबतीत तेजी असेल. वर्षातील सुरूवातीच्या सहा महिन्यात मानसिक, शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या चांगला विकास होण्यासाठी आपल्याला लक्ष द्यावे लागेल. सामान्य जीवनात आपल्याला गती मिळेल. यातून काम करण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्यामुळे कामात आणि जीवनात सफलता मिळेल. यामुळे समस्यांचा सामना करण्यास बळ मिळेल. यातून आपल्या जीवनात परिवर्तन होईल. तणावातून मुक्तता मिळेल. वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात चांगले यश प्राप्ती होणार नाही.

 

जर आपण एकटेच असाल तर आपल्याला प्रेम महत्वाचे वाटू शकेल. तसेच या वर्षात आपण आपले चांगले संबंध प्रस्थापित केल्यास परदेशवारीचा लाभ होऊ शकतो. परदेशवारीत वेगवेगळ्या देशांची माहीती मिळेल आणि लोकांना भेटल्यावर मैत्री वाढीला लागेल. यातून प्रेम आणि दोस्ती वाढेल. ही दोस्ती भविष्यात उपयोगी पडेल. त्यामुळे जीवनात अधिक सफलता मिळण्यास मदत होईल. येणारे २०१३ साल आपल्याला चांगले असेल. यासालात आपण चमकाल. आपल्याला कठीण सालानंतर प्रथम आराम मिळणार आहे. आनंददायी वर्ष असणार आहे.

 

वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात आर्थिक परिस्थिती चांगली राहणार नाही. खर्च जास्त होईल. मात्र, नविन भागिदारांपासून फायदा होईल. आपल्याला पैसे मिळविण्यासाठी अन्य विकल्प शोधन्याची गरज आहे. ते तुम्हाला मिळतील. आपण कन्या राशीचे असल्याने आर्थिक गोष्टी मिळवू शकाल. आपल्याला तोटा होईल, परंतु घाबरून जाण्याची काही गरज नाही. काही काळाने सकारात्मक गोष्टी घडून येतील.

Tags: