यंदाच्या वर्षात म्हणजेच २०१२ मध्ये मागच्या वर्षीशी जुळलेल्या नातेसंबंधाचे फळ मिळेल. नातेसंबंधांमधे जवळीक वाढले आणि प्रेमप्रकरणात प्रगती होईल.
आपल्या जीवनात वेगळी पार्श्वभूमी लाभलेल्या थोड्याशा जुन्या वळणाच्या आणि समजूतदार व्यक्तीची ऑफर मोकळ्या मनाने स्वीकारा. आपल्यावर खुप जबाबदारी असल्याने आपणास दडपण जाणवेल. शनीच्या प्रभावामुळे आपल्या नातेसंबंधांची परिक्षा घेईल. पण नातेसबंधांमध्ये मतभेदांमुळे वेगळं व्हावं लागलं तरी प्रेम खरं असलं तर बराच काळ विभक्त राहावं लागणार नाही याची खात्री बाळगा. यंदाचे वर्ष भरपूर फलदायी आहे पण सावधनता बाळगा की काही गडबड होऊ नये. आपले सामाजिक संबंध आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत.
एप्रिलमध्ये तुम्हाला तुमच्या कामात लक्ष द्यावं लागेल. हा एक जादुभरा क्षण असेल, भूतकाळात घेतलेल्या मेहनतीमुळे तुम्ही प्रशंसेस आणि आदरास पात्र व्हाल. घराची दुरुस्ती हाती घेण्यापूर्वी आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसवा. बचतीच्या माध्यमातून लाभ दुप्पट मिळेल यासाठी प्रयत्न करा.
यंदाच्या वर्षात आईच्या तब्ब्येतीच्या बाबतीत काळजी असेल किंवा वडिलांच्या पेन्शन संदर्भात काही समस्या असेल किंवा तुमच्या बँकिंग व्यवहारांसंबधी काही चिंता असल्यास सर्व गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. यंदाच्या वर्षात घर आणि कुटुंबच्या बाबतीत बऱ्याच सुधारणा होतील.