कर्क – आरोग्यम् धनसंपदा....

मागच्या वर्षी जीवनाच्या सर्व क्षेत्रात घेतलेल्या प्रयत्नांचे परिणाम यंदाच्या वर्षात पाहायला मिळतील. अंर्तज्ञानामुळे योग्य दिशेने जाण्यास तुम्हाला मदत मिळेल. आपण खास व्यक्तीबरोबर राहाल आणि त्याच्या सहवासात प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची संधी तुम्हाला लाभेल.

Updated: Jan 4, 2012, 05:50 PM IST

मागच्या वर्षी जीवनाच्या सर्व क्षेत्रात घेतलेल्या प्रयत्नांचे परिणाम यंदाच्या वर्षात पाहायला मिळतील. अंर्तज्ञानामुळे योग्य दिशेने जाण्यास तुम्हाला मदत मिळेल. आपण खास व्यक्तीबरोबर राहाल आणि त्याच्या सहवासात प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याची संधी तुम्हाला लाभेल. वर्षाचे पहिल्या सहा महिन्यात तुम्ही रचनात्मक कामात शिखर सर कराल. पण त्याचबरोबर सर्तक राहा की त्यामुळे तुम्ही गाफिलही होऊ शकता.

 

वर्षाचा मध्यावर काही नवीन प्रकल्पांवर काम सुरु होईल. यात काही कठिण जबाबादाऱ्याही आहेत. वर्तमान परिस्थितीत बदल संभवतो. आव्हानांचा सामना करताना आपल्यातील लढवय्या प्रवृत्ती आपल्याला मजबूत राहण्यास मदत करेल. त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आपण नोकरी बदलण्याच्या बाबतीत चांगली शिफारीश करु शकाल.

 

आपल्याला सल्ला आहे की आपण आपल्या कामात मग्न राहा आणि बोल्ड राहा. वर्षभरात एकवेळ अशी येईल की रोजगाराशी संबंधित तणाव आणि प्रगती दोन्हींचा सामना करावा लागेल. जर तुम्ही एकटे असाल तर २०१२ मध्ये तुम्हाला साथीदार लाभण्याची शक्यता आहे. २०१२ च्या अखेरीस नाहक खर्च होऊ नये यासाठी सावधानता बाळगा नाहीतर पश्चातापाची पाळी येईल. स्वास्थाच्या दृष्टीने काही चिंता करण्यासारखं नाही. २०१२ हे वर्ष शारिरीक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले जाईल.

Tags: