मीन (व्हॅलेंटाइन डे स्पेशल)

Updated: Feb 14, 2012, 03:34 PM IST

(फेब्रु.१८- मार्च२०)

आजचा व्हॅलेंटाइन्स डे मनातल्या उत्कट इच्छांनी भारून जाईल. आणि शेवटी तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. आता तुमच्या जोडीदाराकडून तुमची इच्छा कुठली हे नीट ठरवा.

 

 

आजचा दिवस आकर्षणाच्या खेळाने भरलेला आहे. मनात एकाहून अधिक वेगवेगळ्या ‘व्हॅलेंटाइन’ इच्छा पिंगा घालत असतील. तुमच्या एकटेपणाच्या रात्री मावळत असल्याची जाणीव तुम्हाला आज होईल.

 

आज दुसरी संधी मिळण्याचीही शक्यता आहे. अनामिक आकर्षणांनी तुम्ही गोंधळून जाल. वेगवेगळ्या व्यक्ती आयुष्यात येतील. तुम्हाला तुमच्या सद्याच्या प्रियकर/प्रेयसीसोबत नातं फुलवायचं आहे की नवा व्हॅलेंटाइन शोधायचा आहे ते तुम्हीच तुमचं ठरवा.

Tags: