गुगल प्लसचे नऊ कोटी युझर्स

फेसबुकला मिळणार्‍या जनाधारामुळेधास्तावलेल्या गुगलने गेल्या जूनमध्ये सुरू केलेल्या गुगल प्लसचाही जम बसण्यास सुरुवात झाली असून, सरत्या आठ महिन्यांत नऊ कोटी युझर्सचा टप्पा कंपनीने पार केला आहे.

Updated: Jan 25, 2012, 03:14 PM IST

www.24taas.comन्युयॉर्क

 

फेसबुकला मिळणार्‍या जनाधारामुळेधास्तावलेल्या गुगलने गेल्या जूनमध्ये सुरू केलेल्या गुगल प्लसचाही जम बसण्यास सुरुवात झाली असून, सरत्या आठ महिन्यांत नऊ कोटी युझर्सचा टप्पा कंपनीने ओलांडला आहे.

 

सोशल नेटवर्किंगकडे दिवसेंदिवस तरुणांचा कल वाढत असून, नवनवीन साईट सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन असलेल्या गुगलने गुगल प्लस ही सेवा सुरू केली होती. गुगल प्लस सेवा २0 सप्टेंबरला खुली करण्यात आली.

 

सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकला ९ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी चार वर्षे लागली होती. मात्र, गुगल प्लसने काही महिन्यांतच हा टप्पा गाठला आहे. फेसबुकची स्थापना २00४ मध्ये झाली असून, त्यांचे सध्या जगभरात ८0 कोटी युर्जस आहेत.

Tags: