दिमाख एनफिल्डच्या 'थंडरबर्ड'चा

मोटरसायकल निर्माती रॉयल एनफिल्डने दिल्लीच्या ऍटो एक्स्पोमध्ये ५०० सीसी बाईक थंडरबर्ड ५०० चे अनावरण केलं. येत्या वर्षाच्या अखेरीस थंडरबर्ड बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीने अजून थंडरबर्डची किंमत किती असेल ते जाहीर केलेलं नाही.

Updated: Jan 6, 2012, 04:22 PM IST

www.24taas.com वेब टीम, मुंबई

 

 मोटरसायकल निर्माती रॉयल एनफिल्डने दिल्लीच्या ऍटो एक्स्पोमध्ये ५०० सीसी बाईक थंडरबर्ड ५०० चे अनावरण  केलं. येत्या वर्षाच्या अखेरीस थंडरबर्ड बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनीने अजून थंडरबर्डची किंमत किती असेल  ते जाहीर केलेलं नाही. दहा वर्षापूर्वी थंडरबर्ड लाँच केल्यानंतर आता आम्ही नवं मॉडेल पूर्णत: नव्याने डिझाईन केलं आहे  आणि शहरात तसंच लाब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना डोळ्यासमोर ठेऊन केलं आहे असं आयशर मोटर्सचे  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ लाल यांनी पत्रकारांना सांगितलं.

 

कंपनी पहिल्या सहामाहीच्या अखेरीस ही मोटरसायकल बाजारात आणणार आहे. कंपनीच्या चेन्नई येथील कारखान्यात थंडरबर्डचे उत्पादन करण्यात येणार आहे. आयशर महिन्याला ७००० मोटरसायकल्सची विक्री करते त्यापैकी थंडरबर्ड ३५० सीसी या मॉडेलचा वाटा १००० मोटरसायकलचा आहे. जून्या ३५० सीसी थंडरबर्डचे उत्पादन बंद करण्याचा आमचा विचार नसल्याचं लाल यांनी सांगितलं. कंपनीचे आणखी एक नवं मॉडेल कॅफे रेसर २०१२ सालच्या पहिल्या सहा माहित बाजारात उपलब्ध होईल असंही लाल यांनी सांगितलं. कंपनीने याव्यतिरिक्त हेलमेट, जॅकेट आणि बूटही लँच केले आहेत.