ह्युंदाईची नवी एमपीव्ही हेक्सा स्पेस

ह्युदाईने दिल्लीच्या ११ व्या ऍटो एक्स्पोमध्ये नवी मल्टी पर्पज वेहिकल हेक्सा स्पेसचे अनावरण केलं. कंपनीने फेब्रुवारी अखेर लँच करण्यात येणारी नवी सोनाटाही लोकांसमोर सादर केली. आम्ही पहिल्यांदाच नव्या संकल्पनेवर आधारीत मल्टी पर्पज वेहिकल हेक्सा स्पेस दाखवत आहोत आणि ही बाजारात कधी दाखल होईल ते सांगता येत नाही

Updated: Jan 5, 2012, 09:04 PM IST

www.24taas.com- वेब टीम, मुंबई

 

 ह्युदाईने दिल्लीच्या ११ व्या ऍटो एक्स्पोमध्ये नवी मल्टी पर्पज वेहिकल हेक्सा स्पेसचे अनावरण केलं. कंपनीने  फेब्रुवारी अखेर लँच करण्यात येणारी नवी सोनाटाही लोकांसमोर सादर केली. आम्ही पहिल्यांदाच नव्या  संकल्पनेवर  आधारीत मल्टी पर्पज वेहिकल हेक्सा स्पेस दाखवत आहोत आणि ही बाजारात कधी दाखल होईल ते  सांगता येत  नाही. हेक्सा स्पेस लँच होण्यास तीन ते चार वर्षांचा कालावधी लागेल असं ह्युंदाई मोटर इंडियाचे  संचालक अरविंद  सकसेना यांनी सांगितलं.

 

हेक्सा स्पेसमध्ये आठ प्रवासी आरामात बसू शकतील आणि  शहरातील ३० ते ४० वयोगटातील ग्राहकांना  डोळ्यासमोर ठेऊन डिझाईन करण्यात आली आहे. या गाडीच्या विकासात भारत काय भूमिका बजावेल असं  विचारलं असता भारत ही कंपनीसाठी खुप मोठी बाजारपेठ असून गाडीच्या विकासात नक्कीच महत्वाची भूमिका बजावेल. पण सध्या फक्त संकल्पनाच सादर करण्यात आली आहे. भारतासाठी प्रॉडक्ट विकसित करण्यासाठी तिथले वातावरण आणि इतर सर्व घटकांचा विचार करावा लागेल. कंपनीने सोनाटाच्या सहाव्या वर्झनचे अनावरण केलं.