पाणीपुरीची दहा नावे तुम्हाला माहीत आहेत का?

चाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतेच. त्यातच भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरीची गाडी म्हणजे मुंबईकरांचा चाट कॉर्नर. तिखट-आंबट, गोड पाण्यांनी भरलेली ही पाणीपुरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का मुंबई महाराष्ट्रात ओळखली जाणारी ही पाणीपुरी देशात, देशाबाहेर तब्बल १० नावांनी ओळखली जाते.

Updated: Jan 10, 2016, 11:13 AM IST
पाणीपुरीची दहा नावे तुम्हाला माहीत आहेत का? title=

मुंबई : चाट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतेच. त्यातच भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरीची गाडी म्हणजे मुंबईकरांचा चाट कॉर्नर. तिखट-आंबट, गोड पाण्यांनी भरलेली ही पाणीपुरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोकांना आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का मुंबई महाराष्ट्रात ओळखली जाणारी ही पाणीपुरी देशात, देशाबाहेर तब्बल १० नावांनी ओळखली जाते.

पाणीपुरी - महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू तसेच नेपाळच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरी हा पदार्थ याच नावाने ओळखला जातो. 

पुचका - पश्चिम बंगाल आणि आसाम या पूर्व भारतात पाणीपुरीला पुचका या नावाने ओळखले जाते. बांगलादेशातही तसेच बिहार आणि झारखंडमध्येही हा पदार्थ याच नावाने ओळखला जातो.

गोलगप्पे - उत्तर भारताता पाणीपुरीला गोलगप्पे हे नाव आहे. 

पकोडी - पकोडी म्हटल्यावर गोंधळून जाण्याची गरज नाहीये. गुजरातच्या अनेक भागांमध्ये पाणीपुरीला पकोडी म्हटले जाते. 

पानी के पताशे - हरयाणाच्या विविध भागांमध्ये या पदार्थाला पानी के पताशे म्हणतात.

पताशी - राजस्थान, उत्तर प्रदेश तसेच लखनऊमधील अनेक भागांमध्ये पाणीपुरीला पताशी नावाने ओळखले जाते.

गपशप - ओदिशा, उत्तर झारखंड, छत्तीसगड, हैदराबाद आणि तेलंगणामध्ये पाणीपुरी हा पदार्थ गपशप नावाने खाल्ला जातो.

फुलकी - गुजरातमध्ये चपातीला फुलका म्हटले जाते. मात्र उत्तर प्रदेशच्या उत्तर भागात तसेच नेपाळच्या काही प्रदेशांमध्ये पाणीपुरीला फुलकी म्हणतात.

टिक्की - मध्य प्रदेशमधील होशनहबादमध्ये पाणीपुरीला टिक्की हे नाव आहे.