मुंबई : जर तुम्ही रिलेशनशिप नाही आहात तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जाणून घ्या काय आहेत सिंगल असण्याचे ५ फायदे
१. जर तुम्ही सिंगल आहात तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत अधिक वेळ घालवू शकता आणि अधिक आनंद तुम्ही मिळवू शकता. मित्रांसोबत मज्जा करण्याची वेळ तुम्हाला अधिक आनंद देते.
२ तुमच्याकडे जर पैसा आहे आणि तुम्ही सिंगल आहात तर तुम्ही त्याचा उपयोग स्वत:वर खर्च करण्यासाठी करु शकता. कोणावरही खर्च करण्यापेक्षा तुमच्या कुटुंबावर तो खर्च करा.
३. तुम्ही काय आहात आणि काय करु शकता हे तेव्हाच माहित पडतं जेव्हा तुम्ही सिंगल असतात. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण स्वत:साठी अधिक वेळ देवू शकतो.
४. रिलेशनशिपमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला स्वत: पेक्षा समोरच्या व्यक्तीवर अधिक लक्ष देता. त्यांच्या आनंदासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे सिगंल असाल तर स्वत:च्या आनंदावर आपण अधिक वेळ देऊ शकू.
५. जेव्हा तुम्ही सिंगल असता तेव्हा तुम्ही कोणत्याही मुलीसोबत बोलू शकता. मस्करी करू शकता किंवा वेळ घालवू शकता तुम्हाला कोणीही अडवणार नाही. पण लक्षात ठेवा की रोडरोमियो सारखं वागू नका.