रिलेशनशिप नवीन असल्यास या ६ मर्यादा पाळा

मुंबई : एखाद्या मुलीसोबत नव्याने सुरू झालेल्या नात्यात अनेक मुलं खूप उत्साही होतात. त्यांचा स्वतःवर संयम राहात नाही. ते काही अशा गोष्टी करतात ज्या त्यांच्या नव्या रिलेशनशिपमध्ये दरी उत्पन्न करू शकतात.

Updated: Apr 4, 2016, 05:19 PM IST
रिलेशनशिप नवीन असल्यास या ६ मर्यादा पाळा title=

मुंबई : एखाद्या मुलीसोबत नव्याने सुरू झालेल्या नात्यात अनेक मुलं खूप उत्साही होतात. त्यांचा स्वतःवर संयम राहात नाही. ते काही अशा गोष्टी करतात ज्या त्यांच्या नव्या रिलेशनशिपमध्ये दरी उत्पन्न करू शकतात.

१) जास्त मेसेज करू नका
तुमची रिलेशनशिप नवीन असेल तर त्यात अतिउत्साही होऊन उगाच तुमच्या गर्लफ्रेंडला जास्त मेसेज करू नका. तिला वेळ द्या. नाहीतर तुमच्या मेसेजमुळे ती मुलगी वैतागू शकते.

२) पहिल्या डेटनंतर लगेच मेसेज करू नका
डेटवर जाऊन आल्यानंतर मुलीला विचार करायला वेळ द्या. डेटनंतर केला जाणारा मेसेज अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. त्यामुळे जो काही मेसेज कराल तो सांभाळून करा.

३) दारू पिऊन मेसेज करू नका
दारू प्यायलेले असाल तर कोणत्याही मुलीला कसलाही मेसेज करण्याचा विचारही करू नका. दारुच्या भरात केलेला हा मेसेज तुमच्या नात्यात समस्या उत्पन्न करू शकतो.

४) रागावले असाल तर मेसेज करू नका
रागाच्या भरात माणसाने काही बोलू नये असे म्हटले जाते. हाच नियम तुमच्या रिलेशनशिपसाठीही लागू होतो. रिलेशनशिपमध्ये काही प्रसंगी तुम्हाला राग येऊ शकतो. पण, म्हणून रागाच्या भरात काहीही चुकीचे करू नका.

५) एका दिवशी एक मेसेज
जर तुमचं नातं नवीन असेल तर तुम्ही फोनवरुन जास्तीत जास्त बोला. त्यामुळेच तुम्ही एकमेकांना जास्त जाणून घेऊ शकता. एखादा मेसेज केला असेल तर उत्तर मिळण्यासाठी पुनःपुन्हा करू नका.

६) जास्त चौकशी करू नका
नात्याच्या सुरुवातीलाच उगाच मेसेज करुन चौकशा करू नका. मुलींना तुमच्या या वागण्याचा राग येऊ शकतो. त्यामुळे नातं नवीन असताना जास्त प्रश्न विचारणं टाळा.