नवी दिल्ली : फेसबूक आता प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबूक एक चांगले माध्यम बनले आहे. मात्र, एक धोका आहे. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही शेअर करू नका, याची काळजी घ्या.
फेसबूकच्या माध्यमातून अनेक काही गोष्टी आपण मित्र, कौटुंबिक लोकांसोबत शेअर करत असतो. आपण जेव्हा एखादी गोष्ट शेअर करतो तेव्हा आपल्याला वाटते की ती फक्त आपण आपल्या लोकांसोबत शेअर करतो. मात्र तसं नसते अकाऊंन्ट हॅक करणारे खूप जण असतात. हॅकर्स आपले अकाऊंन्ट हॅक करुन त्यागोष्टी वाचत असतात.
या पाच गोष्टी टाळाच
जन्मतारीख
स्वतःची आणि कुटूंबाच्या कोणत्याही व्यक्तीची संपूर्ण जन्म तारीख वाढदिवसांच्या दिवशी मित्रपरिवारकडून टाईमलाईनवर आलेले मॅसेज खूप आवडतात. मात्र, सायबर चोरांना आपल्या जवळची माहिती अगदी सहज मिळून जाते. तुम्हांला जर जन्मतारीख लिहायची असल्यास जन्मसाल लिहू नये.
रिलेशनशिप स्टेटस
जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नसालही फेसबुक रिलेशनशिप स्टेटस कधीही शेअर करु नका. कोणीही तुमच्यावर लक्ष ठेवून असू शकतो. तुम्ही कधी सिंगल आहात कधी रिलेशनशिपमध्ये आहात यामुळे तुमच्यासाठी ती अडचण निर्माण होउ शकते.
करंट लोकेशन
काही लोक सगळ्याचं गोष्टी फेसबूकवर अपडेट करत असतात. एखाद्या रेस्टॉरन्टमध्ये जेवायला जात असल्यास फेसबूकवर कोठे आहात आणि त्यासोबत रेस्टॉरन्टच्या नाव टॅग करतात. त्यामुळे सगळ्यांना समजते की तुम्ही कोणत्या वेळी कोठे आहात. जेव्हा तुम्ही ज्या लोकेशनसोबत टॅग करता आणि लिहीता की सुट्टीवर आहे. सुट्टीचा आनंद घेतोय. तर तुम्हांला लुटणाऱ्यांना समजते की तुम्ही कोणत्या लोकेशनवर आहात. तुम्ही सहलीचे फोटो शेअर करा पण सुट्टीवरुन आल्यावरच करा.
घरात एकटे आहात.
खास करुन लहान मुलांनी आपल्या स्टेटसमध्ये लिहू नये, की घरात कधी एकटे आहात. अशा वेळी तुम्ही अनोळखी लोकांना तुमची माहिती देत असतात. त्याचा फायदा कोणीही घेऊ शकतो. आपल्या प्रोफाइलला जास्तीत जास्त प्रायव्हसी सेटींग ठेवावी.
मुलांची फोटो टॅग करताना
बहुतेक अनेक जण आपल्या लहान मुलांचे फोटो शेअर करुन त्यांना टॅग करतात काही जण तर मुलांचा जन्म झाला की त्याच्यासोबत लगेच फोटो आणि रुग्णालाचे नाव ही टॅग करतात. काही वेळा नातेवाईकांचे फोटो असतील तर अशावेळी तुम्ही फोटो पोस्ट करा. मात्र त्या त्या व्यक्तीला त्यात टॅग करु नका.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.