मुंबई : घरची परिस्थिती गरीबीची असतानाही, घाटकोपरच्या राजश्री डोंगरीकर या विद्यार्थिनीनं 92 टक्के गुण मिळवले... आता आयपीएस अधिकारी बनण्याची राजश्रीची इच्छा आहे. पण घरची गरीबी तिच्या या स्वप्नात खोडा तर घालणार नाही ना....
राजश्री डोंगरीकर घाटकोपरच्या सिद्धार्थ नगर येथील डोंगरी भागात राहते. घरची परिस्थिती अतिशय गरीबीची आहे. स्वामी शामानंद शाळेत ती शिकायची. शाळेतून घरी आल्यावर दुपारी ४ वाजता तिला पाणी भरावं लागायचं. डोंगर उतरून खाली जाऊन, हंडा डोक्यावर घेऊन पाणी भरणं हा तिचा नित्यक्रम होता. आई अपंग, वडील ड्रायव्हर, स्वतःचं घर सुद्धा नाही. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं, घराला हातभार लावण्यासाठी घरी छोटं मोठं काम आणून घर चालवण्यात ती मदत करत असे. अशा खडतर परिस्थितीत राजश्रीनं ९२ टक्के गुण मिळवलेत...
भविष्यात यूपीएससी परीक्षा देऊन आयपीएस अधिकारी बनण्याची तिची इच्छा आहे...
राजश्रीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला साथ हवीय ती समाजाच्या मदतीची... गरीबीमुळं तिचं स्वप्न अर्धवट तर राहणार नाही ना...?
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.