'स्मार्टफोन कव्हर' काढणार तुमच्या सेल्फीची प्रिंट!

 एक फ्रेंच कंपनी सध्या असा एक स्मार्टफोन कव्हर बनवतेय... जो काही सेकंदातच तुमच्या फोनवर काढलेला तुमचा सेल्फी प्रिंट करू शकेल.

Updated: Nov 18, 2014, 03:28 PM IST
'स्मार्टफोन कव्हर' काढणार तुमच्या सेल्फीची प्रिंट!

नवी दिल्ली : एक फ्रेंच कंपनी सध्या असा एक स्मार्टफोन कव्हर बनवतेय... जो काही सेकंदातच तुमच्या फोनवर काढलेला तुमचा सेल्फी प्रिंट करू शकेल.

‘प्रिंट’ नावाची कंपनी हा स्मार्टफोन केस बनवण्याचा प्रयत्नात आहे. या कव्हरमध्येच प्रिंटरची सुविधाही असेल, हे याचं वैशिष्ट्य... 
हे मोबाईल कव्हर ब्लू टूथच्या साहाय्यानं स्मार्टफोनशी कनेक्टेड राहील. जवळपास ५० सेकंदांमध्ये हे कव्हर तुमचा फोटो प्रिंट करू शकेल. लवकरच ही वेळ ३० सेकंदांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं या प्रिंट करणाऱ्या कव्हरच्या निर्मात्यांचं म्हणणं आहे.

सध्यातरी या कव्हरमध्ये पेपरचा एकच शीट येते... त्यामुळे यात एका वेळी एकच फोटो प्रिंट केला जाऊ शकेल. परंतु, लवकरच हीदेखील क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकावेळी ३० प्रिंट काढता येतील, असे प्रयत्न सुरू आहेत. 

गेल्या वर्षभरापासून ‘प्रिंट’ ही कंपनी या प्रोजेक्टवर काम करतेय. येत्या जानेवारीपर्यंत हे स्मार्टफोन कव्हर बाजारात येण्याची शक्यता आहे. या कव्हरची किंमतही निर्धारित करण्यात आलीय... ९९ डॉलर्सला हे कव्हर उपलब्ध होऊ शकेल. 

सध्या तरी, ४ इंचाचं स्क्रिन असणाऱ्या स्मार्टफोनसाठी हे कव्हर बनवण्यात आलंय. लवकरच मोठ्या स्क्रिनच्या मोबाईलसाठीही हे कव्हर उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास निर्मात्यांना आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.