डेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक!

ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत. 

Updated: Aug 26, 2015, 03:29 PM IST
डेटिंग वेबासाईट हॅक; जोडीदारांना फसवणाऱ्यांना शॉक! title=

नवी दिल्ली : ऑनलाईन डेटिंग साइट 'अॅश्ले मेडिसन' हॅक करण्यात आलीय. यामुळे, आपले अनैतिक संबंध जगजाहीर होण्याच्या भीतीनं लाखो भारतीय धास्तावलेत. 

मीडियासमोर आलेल्या रिपोर्टनुसार, या साईटवर २.७५ लाखांहून अधिक भारतीयांची अकाऊंट होते. लग्नानंतरही 'पार्टनर' शोधण्यासाठी मदत करणाऱ्या या वेबसाईटला 'द इम्पॅक्ट टीम' नावाच्या ग्रूपनं हॅक केलंय. 

ही वेबसाईट बंद होईपर्यंत या वेबसाईटच्या यूझर्सची खाजगी माहिती आणि क्रेडिट कार्डची माहिती जाहीर आपण जाहीर करतच राहू, अशी धमकीच हॅकर्सनं दिलीय. हॅकर्सच्या दाव्यानुसार, जवळपास ३.७ करोड युझर्सची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध आहे. यामध्ये, ई-मेल्स, क्रेडिटकार्ड यांच्यासोबतच 'सिक्रेट सेक्शुअल फँटसीज'च्याही माहितीचा यात समावेश आहे. त्यामुळे, आपल्या जोडीदाराला फसवणारे आणि 'छोट्या जीवनात प्रेम संबंध' बनवण्यासाठी आतूर असणाऱ्यांना मात्र चांगलाच धक्का बसलाय. 

अधिक वाचा - आता, 'लर्निंग'ही होतंय 'लिक'...

एका रिपोर्टनुसार, या डाटाच्या आधारावर 'टेक्नीलोजिका' या टेक फर्मनं एक वर्ल्ड मॅप तयार केलाय. यामध्ये, कोणत्या देशातून, कोणत्या शहरातून किती लोक या वेबसाईटवर रजिस्टर्ड आहेत, त्यांची यादी दिली गेलीय. यामध्ये...

दिल्ली - ३८,६२० यूझर्स

मुंबई - ३२,८८८ युझर्स

चेन्नई - १६,३५५ यूझर्स

बंगळुरू - १६,२६७ यूझर्स

हैदराबाद - १२,५४८ यूझर्स

कोलकाता - ११,७५१ यूझर्स

पुणे - ९,७३८ यूझर्स

अधिक वाचा - भारतीय कंपन्यांच्या ७० वेबसाईट पाकमधून हॅक

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी हॅकर्सनं काही ब्रिटनच्या नागरिकांची खाजगी माहिती उघड केलीय. आता, अशा पद्धतीनं खाजगी माहिती समोर आल्यानंतर भारतीय हा धक्का कसा पचवणार? ते पाहण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.