'एयरसेल'नं सुरु केली 'फोर जी' सेवा

'टू जी' आणि 'थ्री जी'नंतर आता एयरसेल या दूरसंचार कंपनीनं तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये फोर जी सेवाही सुरू केलीय.

Updated: Aug 19, 2014, 02:40 PM IST
'एयरसेल'नं सुरु केली 'फोर जी' सेवा title=

नवी दिल्ली: 'टू जी' आणि 'थ्री जी'नंतर आता एयरसेल या दूरसंचार कंपनीनं तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये फोर जी सेवाही सुरू केलीय.

त्यामुळे, टू जी, थ्री जी आणि फोर जी या तीनही सेवा पुरविणारी 'एयरसेल' ही खासगी क्षेत्रातील एकमेव दूरसंचार कंपनी ठरलीय. 

'एयरसेल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपम वासुदेव यांनी म्हटल की, 'आम्ही तमिळनाडू आणि जम्मू-कश्मीरमध्ये फोरजी सेवा सुरू करुन खूश आहोत. याआधी आम्ही आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि ओडिसामध्ये फोर जी सेवा सुरू केलीय'.
 
'एअरसेल'कडे आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा, आसाम, ईशान्य आणि जम्मू काश्मीर या राज्यांत 20 मेगाहर्टझ स्पेक्ट्रम आहे. या स्पेक्ट्रम चा उपयोग फोर जी सेवांसाठी होतो. 'एयरटेल'नंतर एयरसेल ही दूसरी कंपनी आहे जी 'एलटीई' (वायरलेस ब्रॉडबॅन्ड टेक्नोलॉजी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फोर जी सेवा पुरवत आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.