‘आई’ होणं टाळण्यासाठी फेसबुक, अॅपलकडून ‘बेबी कॅश’!

आपल्या अपचत्याला जन्म देऊन ‘आई’ होणं हे कोणत्याही महिलेचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं, असं मानलं जातं. पण, फेसबूक, अॅपल मात्र ‘आई’ होणं टाळण्यासाठी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भली मोठी रक्कम ऑफर केलीय. 

Updated: Oct 16, 2014, 10:08 AM IST
‘आई’ होणं टाळण्यासाठी फेसबुक, अॅपलकडून  ‘बेबी कॅश’! title=

न्यूयॉर्क : आपल्या अपचत्याला जन्म देऊन ‘आई’ होणं हे कोणत्याही महिलेचं आयुष्यातलं एक स्वप्न असतं, असं मानलं जातं. पण, फेसबूक, अॅपल मात्र ‘आई’ होणं टाळण्यासाठी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या महिलांना भली मोठी रक्कम ऑफर केलीय. 

‘फेसबुक’मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्याचे अंडाणू फ्रीज करून ठेवण्यासाठी तब्बल १२ लाख रुपये ऑफर करण्यात आलेत.  फेसबुक आणि अॅपल या आपल्या क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी ही ऑफर आपल्या महिला कर्मचाऱ्यांना दिलीय. महिला कर्मचाऱ्यांना 'एग-फ्रीज' करून  ठेवण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे. 

'आई' बनण्याचं आपलं स्वप्न काही काळ बाजुला ठेवल्यानं महिला आपल्या करिअरवर जास्त लक्ष केंद्रीत करू शकतील... आणि वेळ उलटून गेल्यानंतरही त्यांना 'आई' बनण्यात कोणताही समस्या येणार नाही, असं कंपनीनं म्हटलंय. 

एनबीसीच्या रिपोर्टच्या मते, फेसबुकने त्याच्या महिला कर्मचाऱ्यां यासाठी पैसे सुद्धा देण्यास  सुरुवात केली आहे. पण, अॅपल २०१५पासून महिलांना रक्कम देण्याला सुरुवात करणार आहे.

काय आहे 'एग फ्रिजिंग'?
'एग फ्रिजिंग'मध्ये महिलांचे अंडाणू सबझीरो तपमानावर प्रिझर्व्ह (जतन) करून ठेवले जातात. यासाठी तब्बल १०,००० डॉलरचा खर्च येतो. यानंतर स्टोअरेजसाठी वार्षिक काही डॉलर्सचा खर्च येतो. 'अपत्य' हवं असेल तेव्हा या अंडाणुंना फर्टिलाइज करून गर्भाशयात रुजवलं जातं... त्यासाठी वेगळा खर्च येतो. 

काय आहेत प्रतिक्रिया?
जानकारांच्या म्हणण्यानुसार, ज्या महिलांना त्याच्या कुटुंब किंवा करिअर या दोन्ही गोष्टींपैकी एक गोष्ट निवडण्यासाठी दुविधेत पडावं लागतं, अशा महिलांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. 

ज्या महिला आपल्या कामात खूप चांगल्या आहेत, अशांना आपल्या कंपनीत दीर्घकाळापर्यंत काम करण्याची संधी देणं, हे कंपनीचं उद्दीष्ट असल्याचं कंपन्यांनी म्हटलंय.

साधारण: गर्भवती असताना महिला दीर्घकाळाच्या सुट्टीवर जातात किंवा नोकरीवर पाणी सोडतात. अशा वेळी कंपन्यांना त्याचा फटका बसतो.    

महत्त्वाचं म्हणजे, फेसबुक अगोदरपासूनच आपल्या कर्मचाऱ्यांना पालक बनल्यास 'बेबी कॅश' म्हणून तीन लाख रुपये देते. हे तीन लाख रुपये महिला कर्मचारी त्यांना हवं तसं खर्च करू शकतात. त्यामुळे, फेसबुक, अॅपलनं आपल्या कंपनीतील महिलांना हे नवं स्वप्न दाखवून एका नव्या वादाला जन्म दिलाय... हे मात्र नक्की...  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x