मुंबई : तैवानमधील 'आसूस' कंपनीचा बहुप्रतिक्षीत 'झेनफोन सेल्फी' हा स्मार्टफोन तैवानमध्ये लॉन्च करण्यात आला.
हे लॉन्चींग कॉम्युटेक्स २०१५ मध्ये करण्यात आले. सेल्फीची वाढती लोकप्रियता पाहता स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा जास्त मेगापिक्सचा असावा या संकल्पनेतून 'झेनफोन सेल्फी' या स्मार्टफोनला तब्बल १३ मेगापिक्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
झेनफोनची वैशिष्ट्ये :
> ५.५ इंचाच्या स्क्रीनचा झेनफोन सेल्फी
> अँड्रॉईडची अद्ययावत ५.० लॉलीपॉप प्रणाली
> स्क्रीनला ओरखड्यांपासून बचावासाठी गोरीला ग्लास
> रॅमच्या बाबतीत २ आणि ३ जीबी असे दोन पर्याय
> १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा याच वैशिष्ट्यामुळे वेगळा
> 'झेनफोन सेल्फी'ची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.