मुंबई: स्मार्टफोनद्वारे सेल्फी काढणाऱ्यांसाठी एक जबरदस्त अॅप आलं आहे. ज्याद्वारे आपण फक्त गोंधळ घालायचा, ओरडायचं आणि सेल्फी आपोआप काढली जाईल. अॅपलच्या स्मार्टफोनसाठी तयार केलेलं हे कॅमेरा अॅप 'ट्रिगरट्रॅप सेल्फी' आवाजाच्या आधारानं फोनचा कॅमेरा ऑन करतो.
या अॅपला कॅमेऱ्यासाठी ट्रिगर बनवणारी कंपनी ट्रिगरट्रॅपनं तयार केलंय. वेबसाईट petapixel.com नुसार या अॅपच्या मदतीनं सेल्फी घेणं खूप सोपी आहे. आपल्याला फक्त फोन सेल्फीच्या पद्धतीत धरावा लागेल आणि ओरडावं लागले. आपलं ओरडणं ऐकून फोन स्वत: कॅमेरा ऑन करेल आणि आपली सेल्फी काढली जाईल.
सेल्फी काढल्यानंतर हे अॅप आपल्या सेल्फीचा प्रिव्हयू दाखवले आणि दुसरी सेल्फी काढण्यासाठी स्क्रीन क्लिअर करण्यासाठी आपल्या पुन्हा थोडासा गोंधळ घालावा लागेल, आवाज करावा लागेल.
ट्रिगरट्रॅपनुसार ओरडण्याचा आवाज काही ठराविक डेसिबलमध्ये ऐकू आल्यास स्मार्टफोनचा पिक्सेलेटेड स्क्रीन साफ होतो आणि कॅमेरा सेल्फी काढतो. या अॅपमध्ये स्मार्ट फेस डिटेक्शन प्रणाली सुद्धा आहे. म्हणजे आपलं ओरडणं ऐकून कॅमेरा तेव्हाच सेल्फी काढतो, जेव्हा कोणता चेहरा दिसेल.
(with IANS inputs)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.