बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च

बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

Updated: Feb 2, 2016, 05:49 PM IST
बजाजची 'आयएनएस विक्रांत'फेम बाईक 'व्ही' लॉन्च title=

नवी दिल्ली : बजाज ऑटोनं सोमवारी आपली १५० सीसी एक 'व्ही' नावाची आपली नवी मोटारसायकल सादर केलीय. या बाईकचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये भारताची प्रथम विमान वाहक युद्धनौका असलेल्या 'आयएनएस विक्रांत'चा धातू वापरण्यात आलाय. 

या मोटारसायकलची दिल्ली शोरुममध्ये किंमत ६०,००० ते ७०,००० रुपयांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. या बाईकची विक्री मार्चपासून सुरू होईल आणि त्याच वेळेस या बाईक किंमत जाहीर करण्यात येईल.

 

प्रत्येक महिन्याला २०,००० बाईकच्या क्षमतेसोबत आम्ही या बाईकचं उत्पादन सुरू करणार आहोत. मागणी वाढल्यानंतर उत्पादनात वाढ केली जाईल, अशी माहिती बजाज ऑटोच्या अधिकाऱ्यांनी दिलीय. 

बजाज ऑटोनं आयएनएस विक्रांतच्या धातूची खरेदी केली होती. त्यातून या बाईकचे भाग बनवण्यात आलेत. आयएनएस विक्रांत नौदलात १९६१ पासून जानेवारी १९९७ पर्यंत कार्यरत होती. नोव्हेंबर २०१४ मध्ये विक्रांतला भंगार म्हणून विकून टाकण्यात आलं होतं.