व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अडमिनवर गुन्हा दाखल

एका व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला चांगलाच धडा बसला.

Updated: Jan 24, 2016, 06:41 PM IST
व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अडमिनवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : एका व्हॉट्स अॅप ग्रुपच्या अॅडमिनला चांगलाच धडा बसलाय. ज्यामुळे त्याला चक्क तुरूंगाची हवा खावी लागली. एका तरुणाला व्हॉट्स ग्रुपमध्ये एका महिलेला अॅड करणं चांगलंच महाग पडलंय.

तरुणाने व्हॉट्स अॅपवर एक ग्रुप बनवला होता. ज्यामध्ये त्याने त्या महिला वकीलला तिच्या परवानगी शिवाय अॅड केलं. त्यानंतर ग्रुपमधल्या एका व्यक्तीने त्या ग्रुपमध्ये काही आश्लिल फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. त्या महिला वकीलने जेव्हा ते फोटो आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर अॅडमिन विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.

पोलिसांनी आयटी अॅक्टनुसार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. अटक झाल्यानंतर काही काळाने त्यांना जामीन मिळाला.