नवी दिल्ली : इंटरनेट युझर्सना भारत सरकारकडून लवकरच एक खास भेट मिळणार आहे. इंटरनेटवरील वेबसाईटचं नाव म्हणजे यूआरएल आता आपल्या देशी भाषेत येणार आहे. ब्राऊझरमध्ये स्थानिक भाषेत यूआरएल टाईप केल्यानंतर आपण वेबसाईट पाहू शकणार आहोत.
ही व्यवस्था सुरू झाल्यानंतर आपण चीन आणि इतर युरोपीय देशांच्या रांगेत येणार आहोत. या देशांमध्ये आपल्या देशाच्या भाषेत वेबसाईटचा यूआरएल असतो.
आतापर्यंत आपल्याला काहीही सर्च करण्यासाठी यूआरएल लिहणं महत्वाचं होतं, आता आपण आपल्या भाषेत लिहलं तरीही वेबसाईट आपल्याला पाहता येणार आहे. वेबसाईटचं डोमेन स्थानिक भाषेत टाकलं तरी चालणार आहे. याला डॉट भारत डोमेन नेम म्हणतात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.