मुलांचा लर्निंग पॅटर्न जाणून घेण्यासाठी फ्री मोबाईल अॅप

आजच्या युगात सर्व काही स्मार्ट झालं आहे, या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य अधिक स्मार्ट व्हावा यासाठी पालक प्रयत्न करत असतात. अशाच पालकांची गरज लक्षात घेऊन मुलांच्या शिक्षणाचा पॅटर्न सांगणारे एक जबरदस्त अॅप बाजारात आले आहे. एक्समप्लक्स (exemPlux) असे या अॅपचे नाव असून त्याने पालकांना आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवावे यासाठी मदत केली आहे. 

Updated: Jun 30, 2015, 03:40 PM IST
मुलांचा लर्निंग पॅटर्न जाणून घेण्यासाठी फ्री मोबाईल अॅप  title=

मुंबई : आजच्या युगात सर्व काही स्मार्ट झालं आहे, या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य अधिक स्मार्ट व्हावा यासाठी पालक प्रयत्न करत असतात. अशाच पालकांची गरज लक्षात घेऊन मुलांच्या शिक्षणाचा पॅटर्न सांगणारे एक जबरदस्त अॅप बाजारात आले आहे. एक्समप्लक्स (exemPlux) असे या अॅपचे नाव असून त्याने पालकांना आपल्या मुलांना कोणत्या पद्धतीने शिकवावे यासाठी मदत केली आहे. 

प्रत्येक मुलाची शिकण्याची आपली वेगळी पद्धत असते. काही जण व्हिडिओ किंवा चित्र पाहून शिकतात, त्याला व्हिज्युअल स्पेशल म्हणतात. तर काही संगीत आणि ऑडिओच्या माध्यमातून पकटन गोष्ट ध्यानात घेतात, त्यांना म्युझिकल रिदमिक आणि हार्मोनिक म्हणतात. काही मुलं अॅक्टिविटीतून शिकतात त्यांना ब़ॉडी किनिस्थॅटिक म्हणतात. 

एक्समप्लक्स (exemPlux)च्या माध्यमातून पालक आपल्या मुलाचा लर्निंग पॅटर्न जाणून घेऊ शकतात. त्यासाठी या एक्समप्लक्समध्ये ११ प्रश्न आहेत. त्याची उत्तर देण्यासाठी केवळ ३ मिनिटंच लागतात. 

प्रत्येक प्रश्न हा शास्त्रीय पद्धतीने निवडण्यात आला आहे. एक शास्त्रीय फॉर्म्युला वापरून त्याचा रिझर्ल्ट काढण्यात येतो. हा रिझर्ल्ट पालकांनी दिलेल्या उत्तराच्या आधारावर काढण्यात येतो. त्यामुळे योग्य उत्तर देऊन आपल्या मुलाचा लर्निग पॅटर्न जाणून घेता येतो. 

हे अॅप ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उपयोगी पडणारे आहे. हे फ्री मोबाईल अॅप वापरून पालक आपल्या मुलांचा लर्निंग पॅटर्न सहज जाणून घेऊ शकतात. तसेच आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाला योग्य दिशा देऊ शकतात. 

हे फ्री मोबाईल अॅप सी ३ सोल्यूशन या मुंबईतील कंपनीने डेव्हलप केले आहे. तसेच या अॅपसाठी प्रश्नावली बॉक्स ३ लर्निंग पुणे यांनी तयार केली आहे. 

युजर्स exemPlux गुगल प्ले स्टोअरवरूनही इन्स्टॉल करू शकतात. किंवा खालील लिंकवरून डाऊनलोड करा.  https://play.google.com/store/apps/details?id=com.mac.exemplux  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.