'इंटरनेट डॉट ओआरजी' भारतातही विरोध

 'इंटरनेट डॉट ओआरजी' या फेसबुकचा महत्वाकांक्षी प्रकल्पाला जगभरातून विरोध होत आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना जगातील ३१ देशांमधील ६५ संघटनांनी याबाबतचा विरोध दर्शविणारे खुले पत्र लिहिले आहे.

Updated: May 20, 2015, 06:32 PM IST
'इंटरनेट डॉट ओआरजी' भारतातही विरोध title=

नवी दिल्ली :  'इंटरनेट डॉट ओआरजी' या फेसबुकचा महत्वाकांक्षी प्रकल्पाला जगभरातून विरोध होत आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना जगातील ३१ देशांमधील ६५ संघटनांनी याबाबतचा विरोध दर्शविणारे खुले पत्र लिहिले आहे.

भारतातील नेट न्युट्रॅलिटीचा 'इंटरनेट डॉट ओआरजी' प्रकल्प भंग करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.  भारतातील मिडियानामा आणि सेव्हदइंटरनेट या ग्रुपनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. 

विरोध दर्शविणाऱ्या देशांमध्ये अमेरिका, भारत, इजिप्त, दक्षिण कोरिया, सोल्व्हेरिया, नायजेरिया आणि पाकिस्तानसह अन्य काही देशांचा समावेश आहे.  

अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संधीची समानता, सुरक्षा, गोपनियता आणि नावीन्यपूर्णता यांना या प्रकल्पामुळे धोका असल्याचे पत्रात म्हटले आहे. या प्रकल्पाद्वारे विनामूल्य इंटरनेट पुरविण्याचा दावा करण्यात येत आहे. 

मात्र प्रत्यक्षात इंटरनेटवरील अतिसुक्ष्म भागच या प्रकल्पाद्वारे उपलब्ध होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे विशिष्ट सेवाच विनामूल्य पुरविल्या जात असल्याने 'नेट न्युट्रॅलिटीट'चा भंग होत असल्याचेही म्हटले आहे.

इंटरनेट डॉट ओआरजी म्हणजे काय?
फेसबुकने केलेला हा खटाटोप आहे, जगभरातील विकसनशील देशातील नागरिकांना निवडक इंटरनेट सेवा विनामूल्य उपलब्ध होण्यासाठी फेसबुकचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 

फेसबुकने या प्रकल्पासाठी जगभरातील सात मोबाईल कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामध्ये सॅमसंग, इरिक्‍शन, मिडियाटेक, मायक्रोसॉफ्ट, ओपेरा सॉफ्टवेअर, रिलायन्स आणि क्वालकोम यांचा समावेश आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.