'व्हॉट्स अॅप' पेक्षा फास्ट अॅप बनवलं ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने

व्हॉट्स अॅप पेक्षा अधिक फास्ट अॅप एका पाचवी मधल्या मुलांने बनवलं आहे. या व्हॉट्स अॅपचं वैशिष्ट म्हणजे हे अॅप व्हॉट्स अॅपपेक्षा अधिक फास्ट आहे. त्यामुळे काहीही शेअर करतांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. 

Updated: Jan 25, 2016, 07:15 PM IST
'व्हॉट्स अॅप' पेक्षा फास्ट अॅप बनवलं ५ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने title=

हरिद्वार : व्हॉट्स अॅप पेक्षा अधिक फास्ट अॅप एका पाचवी मधल्या मुलांने बनवलं आहे. या व्हॉट्स अॅपचं वैशिष्ट म्हणजे हे अॅप व्हॉट्स अॅपपेक्षा अधिक फास्ट आहे. त्यामुळे काहीही शेअर करतांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. 

या अॅपचं दुसरं वैशिष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही गोपनियता ठेऊ शकता. कोणतही चॅट तुम्ही हाईड करुन ठेऊ शकता. तुमचं अकाऊंट हॅक झालं तर त्याचा आयपी ट्रेस होऊ शकतो. तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे स्टीकर देखील कोणालाही पाठवू शकता. या अॅपचं नाव ड्राईक असून ते गूगल स्टोरमध्ये उपलब्ध आहे. 

पाचवीत शिकणाऱ्या अशेष अरोडा याने हे अॅप बनवलं आहे. अशेष हा एवढा हुशार आहे की तो आताही कोणाचंही अकाऊंट हॅक करू शकतो. अशेषला भविष्यात सॉफ्टेअर इंजिंनियर व्हायचंय.