मुंबई: ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं दावा केलाय की, बिग बिलियन डेज सेलच्या पहिल्या १० तासांच्या आता त्यांनी १० लाखांच्या वस्तूंची विक्री केलीय. कंपनीनुसार देशभरातील लोकांनी वेबसाईटवर ६० लाख वेळा भेट दिली. कंपनीनं हे सुद्धा सांगितलंय की, आम्ही प्रति सेकंद २५ वस्तू विकल्या.
फ्लिपकार्टनुसार मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक बंगळुरू, दिल्ली आणि चेन्नईतील लोकांनी शॉपिंग केलं. तर दुसरे शहर जसे लुधियाना, लखनऊ आणि भोपाळमध्ये लोकांनीही बिग बिलियन डेज सेलचा फायदा घेतला. कंपनीनं सर्वाधिक विकल्या गेलेल्या वस्तूबद्दलही सांगितलंय, त्यात चपला, कपड्यांचा समावेश आहे.
आणखी वाचा - ई-शॉपिंग वेबसाईटवर मिळतात 'फेक डिस्काऊंट'!
फ्लिपकार्ट प्रमुख मुकेश बंसल यांनी सांगितलं की, 'आम्ही आतापर्यंत १० लाखांचं सामान विकलंय, लोकांनी मागील दोन दिवसांत फ्लिपकार्टचे १६ लाख अॅप इंस्टॉल केले गेलेत. '
कंपनीचा हा सेल फक्त अॅप बेस्ड आहे, म्हणजे वेबसाईटद्वारे या सेलचा फायदा घेता येणार नाही.
आणखी वाचा - स्नॅपडीलचा धमाकेदार सेल, आयफोनसह स्वस्तात इलेक्ट्रॉनिक सामान
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.