फ्लिपकार्टची एका दिवसात ६ अब्ज १५ कोटींची कमाई, फेसबुकलाही पिछाडलं

देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनं सोमवारी कमवण्याचा एक नवा रेकॉर्ड बनवलाय. कंपनीनं दिवसाच्या सुरुवातीलाच अनेक वस्तूंवर भरमसाठ सूट देण्याचं जाहीर केलं आणि वेबसाइटवर ग्राहकांची झुंबड उडाली. दिवसभर वेबसाइट अनेक वेळा क्रॅश झाली. 

Updated: Oct 7, 2014, 01:44 PM IST
फ्लिपकार्टची एका दिवसात ६ अब्ज १५ कोटींची कमाई, फेसबुकलाही पिछाडलं title=

मुंबई: देशातील सर्वात मोठी ऑनलाइन इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टनं सोमवारी कमवण्याचा एक नवा रेकॉर्ड बनवलाय. कंपनीनं दिवसाच्या सुरुवातीलाच अनेक वस्तूंवर भरमसाठ सूट देण्याचं जाहीर केलं आणि वेबसाइटवर ग्राहकांची झुंबड उडाली. दिवसभर वेबसाइट अनेक वेळा क्रॅश झाली. 

पण फेसबुकचेही सर्व रेकॉर्ड्स तोडून फ्लिपकार्टनं एक अब्ज हिट्स एका दिवसात मिळवलेत आणि नवा रेकॉर्ड बनवलाय. तर तब्बल ६१५ कोटींची कमाई केली. बंगळुरूच्या या ऑनलाइन रिटेल कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, “आमच्या वेबसाइटला सोमवारी १ अब्ज हिट्स मिळाल्या आणि आम्ही २४ तासांमध्ये १० कोटी डॉलर (६१५ कोटी रुपये)ची विक्रीचं लक्ष्य अवघ्या १० तासांमध्ये पूर्ण केलं.”

'बिग बिलियन डे' सेलच्या नावानं कंपनीनं सेल सुरू केला होता. एका वृत्तपत्रानुसार २४ तासांमध्ये ‘बिग बिलियन डे’मुळं १० लाखांहून अधिक मोबाईल अप्लिकेशन डाऊनलोड केले गेले. 

फ्लिपकार्टवर सोमवारी २५ हजारहून अधिक  टिव्ही सेट विकल्या गेले. तर पाच लाखांहून अधिक मोबाईल फोनची विक्री झाली. कपडे आणि चपलांनीही पाच लाख रुपये कमावून दिले.    

सूटची ऑफर सुरू झाल्यानंतर काही तासांमध्ये अनेकांनी वेबसाइट सुरू केल्यानं वेबसाइट दुपारी क्रॅश झाली. यानंतर सोशल मीडियावर कंपनीविरोधात खूप तक्रारी येऊ लागल्या. 

फ्लिपकार्टला आपल्या प्रतिद्वंदी वेबसाइट स्नॅपडील आणि अॅमेझॉनकडून चांगलीच टक्कर मिळतेय. स्नॅपडीलनं पण कालच दिवसभरात ६०० कोटींचे उत्पादन विकल्याचा दावा केलाय. 

दिवाळी येतेय त्यामुळं शॉपिंग वेबसाइटदरम्यान सुरू असलेली स्पर्धा ग्राहकांना फायद्याची ठरू शकते का, हे पाहावं लागेल. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.