स्काइप कॉल सुविधा करणार बंद

सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या स्काइपने देशांतर्गत लँडलाइन आणि मोबाइलवर व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय केला आहे. ही सुविधा येत्या १० नोव्हेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे. 

Updated: Oct 7, 2014, 08:08 AM IST
स्काइप कॉल सुविधा करणार बंद  title=

नवी दिल्ली : सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या स्काइपने देशांतर्गत लँडलाइन आणि मोबाइलवर व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय केला आहे. ही सुविधा येत्या १० नोव्हेंबरपासून बंद होण्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टने स्काइप सुविधा ही सुविधा दिली होती. मात्र, ती बंद करण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, कंपनीने दिलेल्या माहितीनुसार भारताच्या बाहेरून स्काइपद्वारे भारतातील लँडलाइन अथवा मोबाइलवर संपर्क साधण्याची सुविधा मात्र चालू राहणार आहे. त्याचप्रमाणे इतर देशांमध्येही भारतातून कॉल करता येणार आहे. 

स्काइपसारख्या सुविधेमुळे इंटरनेटच्या साह्याने व्हिडिओ कॉलिंग मोफत करता येते. भारत सरकारच्या नियमांनुसार, मात्र इंटरनेटवरून व्हॉइस कॉल करण्यास परवानगी नाही. त्यामुळे भारतातून केले जाणारे व्हॉइस कॉल्स इतर देशांमधून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रिरूट केले जातात.

दरम्यान, ही सुविधा बंद होण्याने ज्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे, त्यांना कंपनीकडून भरपाई दिली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.