बिन्नी बंसल हाती घेणार 'फ्लिपकार्ट'ची सूत्रं!

देशाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये आता उच्चस्तरावर मोठे फेरबदल होत आहेत. 

Updated: Jan 12, 2016, 05:33 PM IST
बिन्नी बंसल हाती घेणार 'फ्लिपकार्ट'ची सूत्रं! title=

मुंबई : देशाची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी म्हणून ओळखली जाणाऱ्या फ्लिपकार्टमध्ये आता उच्चस्तरावर मोठे फेरबदल होत आहेत. 

सोमवारी कंपनीकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार, या कंपनीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बंसल यांची जागा आता कंपनीचे सह-संस्थापक बिन्नी बंसल घेणार आहे. 

फ्लिपकार्टनं जाहीर केलेल्या एका अधिकृत घोषणेमध्ये सचिन बन्सल 'फ्लिपकार्ट'च्या एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदी कायम राहणार असल्याचं म्हटलं गेलंय. आपल्या ईकॉमर्स वेबसाईटसाठी तो स्ट्रॅटेजिक डायरेक्शन देण्याचं काम करणार आहे तसंच गुंतवणुकीच्या आणखी संधी शोधण्याची जबाबदारीही त्याच्यावर असेल. 

मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्यापूर्वी बिन्नीनं फ्लिपकार्टच्या चीफ ऑपरेटींग ऑफिसर पद सांभाळलंय. ३३ वर्षांच्या बिन्नीनं आयआयटी दिल्लीमधून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगची डिग्री घेतलीय.