७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल, या देशांत फिरणे आहे स्वस्त

जर तुम्ही फिरण्याचे शौकीन आहात तर ही माहिती तुमच्यासाठीट आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सफर तुम्ही स्वस्तात करु शकता. इथे केवळ राहणेच स्वस्त नाहीये तर खाण्यापिण्यासाठीही जास्त खर्च करावा लागात नाही.

Updated: Jul 14, 2016, 10:52 AM IST
७० रुपयांत खाणे, २०० रुपयांत हॉटेल, या देशांत फिरणे आहे स्वस्त title=

मुंबई : जर तुम्ही फिरण्याचे शौकीन आहात तर ही माहिती तुमच्यासाठीट आहे. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत ज्यांची सफर तुम्ही स्वस्तात करु शकता. इथे केवळ राहणेच स्वस्त नाहीये तर खाण्यापिण्यासाठीही जास्त खर्च करावा लागात नाही.

जाणून घ्या हे देश

थायलंड - थायलंडचे नाव घेताच बीच आणि पार्टी आठवते. येथे तुम्हाला अवघ्या २५० रुपयांपर्यंत रुम मिळू शकते. तसेच २०० रुपयांत खाणे मिळू शकते.

नेपाळ - नेपाळ नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही ६०० रुपयांती तीन वेळा जेवणाची मजा घेऊ शकता. तसेच २७० रुपयांत तुम्ही रुमही बुक करु शकता. 

व्हिएतनाम - स्वस्त खाणे आणि भरपूर शॉपिंगसाठी तुम्ही या देशाची निवड करु शकता. इथे व्हिएतनामी डिशची मजा केवळ ६६ रुपयांपर्यंत घेता येते. तसेच २०० रुपयांपर्यंत रुम बुक करण्याची सुविधा आहे. 

चीन - चीनमध्ये फिरण्यासाठी तुम्हाला तुमचे बजेट वाढवावे लागणार नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा खर्च चीनमध्ये केवळ ६६ रुपये इतका होतो. 

इंडोनेशिया - नॅचरल ब्युटीची मजा घ्यायची असल्यास इंडोनेशियाला नक्की भेट द्यावी. इंडोनेशियात तुम्ही केवळ ६७ रुपयांत डिनर करु शकता. तसेच २५० रुपयांत हॉटेल बुक करु शकता. 

बुल्गारिया - बुल्गारिया ईस्टर्न युरोपमध्ये आहे. खरतंर युरोप, साऊथ-ईस्ट एशिया आणि अमेरिकेपेक्षाही महाग आहे. मात्र बुल्गारियमध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाहीत. तेथे १ लीटर बियर १३० रुपयांत मिळते. येथे तुम्ही ६०० रुपयांत रुम बुक करु शकता.

कंबोडिया - कंबोडियामध्ये खाण्यापिण्यासाठी तसेच राहण्यासाठी जास्त खर्च होत नाही. येथे हॉटेलमध्ये तुम्ही २५० रुपयांपर्यंत जेवण जेवू शकता. 

पेरु - जगातील कुल आणि मॅजिकल ठिकाण म्हणजे पेरु. येथे तुम्ही ५०० रुपयांत रुम बुक करु शकता. ३५० रुपयांत तुम्हाला जेवण मिळते.