नवी दिल्ली : सॅमसंगचा लवकरच भारतात लॉन्च होणारा 'सॅमसंग गॅलक्सी एस6' हा फोन फ्री मिळतोय, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर... कदाचित तुमचा लवकर विश्वास बसणार नाही... पण, हे खरं आहे.
दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगनं आपल्या निष्ठावंत ग्राहकांसाठी ही ऑफर खुली केलीय. या ऑफरचा लाभ तुम्हालाही मिळू शकतो. परंतु, या ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे अगोदरपासूनच गॅलक्सी सीरिज स्मार्टफोन असायला हवा. आत्तापर्यंत या स्कीमचा फायदा हजारो ग्राहकांनी घेतलाय.
फ्रीमध्ये गॅलक्सी एस 6 स्मार्टफोनची ऑफर सध्या केवळ दक्षिण कोरियामध्ये देण्यात आलीय. या ऑफरचा फायदा केवळ सॅमसंगच्या निष्ठावंत ग्राहकांना म्हणजेच ज्या ग्राहकांकडे गॅलक्सी एस सीरिज स्मार्टफोन्स आहेत किंवा असे ग्राहक जे अजूनही कंपनीचा पहिला स्मार्टफोन 'गॅलक्सी एस 1' वापरत आहेत. 1 एप्रिलपासून सुरू झालेल्या या ऑफरचा फायदा अनेक ग्राहकांनी घेतलाय.
सॅमसंगचा हा सर्वांत नवीन आणि अत्याधुनिक स्मार्टफोन आहे. हा फोन 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस' दरम्यान लॉन्च करण्यात आलं होतं.
अॅन्ड्रॉईड 5.0 लॉलीपॉप ओएसवर काम करणाऱ्या या फोनमध्ये 5.1 इंचाची डिस्प्ले स्क्रीन, 2.1 गीगाहर्टझ क्वॉडकोअर +1.5 गीगाहर्टझ क्वॉडकोर प्रोसेसर तसंच 3 जीबी रॅम उपलब्ध आहे. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा तसंच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. 2500 एमएएच बॅटरीस हा स्मार्टफोन 32 जीबी, 64 जीबी आणि 128 जीबीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलाय. भारतात या फोनची किंमत 49,900 रुपये आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.