मुंबई : दहावीच्या २०१५च्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै २०१५ मध्ये घेण्यात आली.
आता याच पद्धतीने २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून बारावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी त्याच वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात त्यांची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
नापास झालेल्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेत पास झाल्यास लगेचच कॉलेजला प्रवेश घेता येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.