दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. आता केवळ फक्त फॉर्म भरले तरी चालणार आहे. 

Updated: Nov 15, 2016, 10:18 PM IST
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा title=

मुंबई : पाचशे आणि हजार रुपयाच्या नोटा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिलाय. आता केवळ फक्त फॉर्म भरले तरी चालणार आहे. 

शुल्क भरण्यासाठी फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात येईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. 

नोटा बंद केल्यानं शुल्क भरताना अडचणी येत असल्याची तक्रार विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि काही विद्यार्थी संघटनांनी केली होती. त्यानंतर फॉर्म भरतानाच शुल्क घेणं बंधनकारक नसल्याचा निर्णय़ शिक्षण विभागानं घेतला.

यंदा दहावीला १७ लाख तर बारावीच्या परीक्षेला अंदाजे १४ लाख विद्यार्थी बसतील असा अंदाज आहे. यापैकी बारावीची परीक्षा अर्ज प्रक्रिया बहुतांश पूर्ण झाली असली, तरी काही जणांचे अर्ज आणि शुल्क येणं बाकी आहे. या विद्यार्थ्यांनाही सरकारच्या निर्णयाचा फायदा होणार आहे.