अॅपलचा स्वस्तातला आयपॉड भारतात दाखल

अॅपलचे प्रोडक्टस महाग असल्याने अॅपल प्रेमींना त्या वस्तू वापरता येत नाहीत. मात्र, आता अशाच ग्राहकांसाठी खूशखबर आहे.

Updated: Jun 28, 2014, 04:48 PM IST
अॅपलचा स्वस्तातला आयपॉड भारतात दाखल title=

नवी दिल्ली : अॅपलचे प्रोडक्टस महाग असल्याने अॅपल प्रेमींना त्या वस्तू वापरता येत नाहीत. मात्र, आता अशाच ग्राहकांसाठी खूशखबर आहे.

आता अॅपलचा 16 जीबी चा आयपॉड टच पोर्टेबल मीडिया प्लेयर भारतात केवळ 16,900 रुपयांना उपलब्ध होणार आहे.
या आयपॉडमध्ये 5 मेगापिक्सल आयसाईट कॅमेरा असून तुम्ही त्याच्यासोबत 1080 पीएचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकाल. या आयपॉडमध्ये रेटिना डिस्प्ले 4 इंच, ए5 चिप किंवा फेस टाईम कॅमेराही आहे. 
32 जीबी कॅपेसिटी असलेल्या आयपॉडची किंमत 20,900 रुपये तर 64 जीबी असलेल्या आयपॉडची किंमत 24,900 रुपये आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.