गुगल सर्च यादी २० लोकप्रिय भारतीय महिला

गुगलने महिला दिनांच्यानिमित्ताने २० यशस्वी भारतीय महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या महिलांची नावे आहेत.

Updated: Mar 8, 2014, 04:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुगलने महिला दिनांच्यानिमित्ताने २० यशस्वी भारतीय महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत गुगलवर सर्वात जास्त सर्च केल्या गेलेल्या महिलांची नावे आहेत.
बॉलिवूड ते राजकारण, फॅशन, व्यापारी जगत, खेळ यांच्याशी निगडित असण्याऱ्या सर्व महिलांचा यात समावेश आहे. गुगलच्या या यादीत पहिलं स्थानं बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने पटकावलय. तर अभिनयात श्रेष्ठ असणारी विद्या बालन दुसऱ्या नंबरवर आहे.
२० महिलांमध्ये ४ राजकारणी महिल्यांचा समावेश आहे. त्यापैकी सोनिया गांधी यांना तिसरे, जयललिता, ममता बनर्जी आणि सुषमा स्वराज यांना अनुक्रमे चौथे, आठवे आणि दहावे स्थान मिळाले आहे. खेळातील २ महिलासुद्धा या यादीत आहेत. बेडमिंटन क्वीन सायना नेहवाल ५व्या आणि लंडनच्या ऑलम्पिक स्पर्धेत भारताला कास्य पदक मिळवून देणारी बॉक्सर मेरी कॉम १७व्या क्रमांकावर आहे.
तसेच या यादीत डेली सोप क्वीन एकता कपूर ६व्या, भारताची पहिली महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी ७व्या, नीता अंबानी ९व्या, लेखिका अरुणधती रॉय ११व्या, फॅशन डिझाईनर रितू कुमार आणि नीता लुल्ला क्रमश: १२व्या, १४व्या, बॉलिवूड अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ता शबाना आझमी १३व्या, चित्रपट बनवणारी मिरा नायर १५व्या, पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नुयी १६व्या, पेज थ्री कल्चर अशी ओळख आणि लेखक शोभा डे १८व्या, अॅक्सिस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शीखा शर्मा १९व्या स्थानावर आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव या यादीत २०व्या स्थानावर आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.