नवी दिल्ली : समोरचा व्यक्ती आपल्याशी खरं बोलतोय की खोटं बोलतंय हे ओळखण अनेकदा शक्य नसतं. मात्र त्याच्या चेहऱ्यावरच्या हावभावावरुन तुम्ही त्याच्या बोलण्याचा अंदाज लावू शकता. त्या व्यक्तीचा चेहरा, बोलण्याची पद्धत, डोळे, हालचालींचे निरीक्षण करुन तो माणूस खोटं बोलतोय की खरं याची माहिती मिळवू शकता.
जाणून घ्या याबाबतच्या काही टिप्स
समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हालचालींचे बारीक निरीक्षण करा. खोटं बोलणाऱ्या व्यक्तींच्या भुवया नेहमी काही प्रमाणात उंचावलेल्या असतात.
समोरचा व्यक्ती बोलताना जर सतत नाकाला आणि तोडांला स्पर्श करत असेल तर तो खरं बोलत नाही
डोळ्यांच्या हालचालीवरुनही समोरचा व्यक्ती खोटं बोलत असल्याचा अंदाज तुम्ही लावू शकता. जेव्हा व्यक्ती खोटं बोलत असताना तेव्हा भुवयांची उघडझाप झटपट होत असते.
समोरच्या व्यक्तीच्या नजरेत नजर घालून न बोलणे हे ही खोटं बोलत असल्याचे लक्षण आहे. जर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलताना नजर चोरुन बोलत असेल तर ती नक्कीच तुमच्याशी खोटं बोलतेय.
गरजेपेक्षा अधिक स्पष्टीकरण देणाऱ्या व्यक्तीही अनेकदा खोटं बोलत असतात.
बोलताना समोरच्या व्यक्तीला घाम फुटत असले तर ती व्यक्ती नक्कीच खोटं बोलतेय असं समजा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.