पावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन

पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.

Updated: Jun 23, 2016, 09:16 PM IST
पावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन title=

मुंबई : पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. पावसामध्ये स्मार्टफोनमध्ये पाणी जाऊन तो खराब व्हायची शक्यता सर्वाधिक असते, त्यामुळे फोन सुरक्षित ठेवण्यासाठी या आहेत पाच टीप्स

पावसाळ्यामध्ये फोन झिपलॉक पिशवी किंवा बटव्यामध्ये ठेवा

पावसाळ्यामध्ये बाहेर पडत असाल तर फोन कधीच हातात ठेवू नका

फोनसाठी वॉटरप्रुफ कव्हर विकत घ्या 

गरज असेल तर ब्लूटुथ हँडसेटचा वापर करा

नवीन स्मार्टफोन घ्यायच्या तयारीमध्ये असाल तर वॉटरप्रुफ स्मार्टफोन चांगला ऑप्शन ठरू शकतो.