मोबाईलमधील अॅपसचे ऑटो अपडेट कसे कराल बंद

बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनवर अॅपस डाऊनलोड करतो जी आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे आपला खूप मोबाईल डेटा खर्च होतो. अॅपसमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हे अपडेट दिले जातात असं अॅप बनवणाऱ्या कंपन्या सांगत असतात. अनेकदा सुरक्षेसाठी हे अपडेट दिले जातात. 

Updated: Jun 30, 2015, 04:38 PM IST
मोबाईलमधील अॅपसचे ऑटो अपडेट कसे कराल बंद title=

मुंबई : बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोनवर अॅपस डाऊनलोड करतो जी आपोआप अपडेट होत राहतात. यामुळे आपला खूप मोबाईल डेटा खर्च होतो. अॅपसमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हे अपडेट दिले जातात असं अॅप बनवणाऱ्या कंपन्या सांगत असतात. अनेकदा सुरक्षेसाठी हे अपडेट दिले जातात. 

 
काही वेळा लोकांना ऑटो अपडेटपेक्षा ते गरज असेल तेव्हाच अपडेट कराव असं वाटत असतं. तुम्हालाही असं वाटत असेल तर ते शक्य आहे. यासाठी आपल्या अॅप सेटिंगमध्ये जाऊन ऑटो अपडेटचा ऑप्शन बंद ठेवावा लागेल. 
 
ऑटो अपडेटचा ऑप्शन बंद करण्यासाठी
- प्ले स्टोअरमध्ये जावे लागेल. त्यात डाव्या बाजूच्या तीन डॉटवर टॅप केल्यावर सेटिंग्सची निवड करा.
- त्यात जाऊन ऑटो अपडेट अॅपस् हा ऑप्शन अनचेक करा. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.