मुंबई : स्मार्टफोनच्या बाजारातील चढता आलेख लक्षात घेऊन अनेक कंपन्या आपले कमी किंमतीत जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. याच स्पर्धेत तैवानची मोबाईल कंपनी ‘एचटीसी’नं आपले दोन नवे दमदार स्मार्टफोन बाजारात उतरवलेत.
डिझायर 616 आणि वन (E8) अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. दोन्हीही स्मार्टफोन ड्युएल सिमधारक आहेत. डिझायनर 616 पुढच्या आठवड्यापासून बाजारात उपलब्ध होईल तर वन (E8) या महिन्याच्या शेवटपर्यंत बाजारात दाखल होईल.
एचटीसी वन (E8)
या स्मार्टफोनमध्ये 2.5 गिगाहर्टझ क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 801 क्वॉडोर चिपसेट देण्यात आलंय. 5 इंचाची फूल एचडी स्क्रीन या फोनमध्ये उपलब्ध आहे. यात 16 जीबीचं इंटरनल स्टोअरेज कॅपेसिटी देण्यात आलीय... एक्स्टर्नल कार्डच्या साहाय्यानं ती वाढवता येऊ शकते.
या फोनच्या कॅमेऱ्यावरही विशेष लक्ष दिलं गेलंय. यात 13 मेगापिक्सल फ्रंट आणि 5 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आलाय. फोनमध्ये 2600 मेगाहर्टझची बॅटरी दिली गेलीय.
हा फोन अँन्ड्रॉईड 4.4.2 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. हा फोन जीएसएम आणि सीडीएमए दोन्हीही नेटवर्कला सपोर्ट करतो.
एचटीसी डिझायर 616
एचटीसीनं हा फोन सोमवारी सिंगापूरमध्ये लॉन्च केलाय. या फोनमध्ये 5 इंचाच्या डिस्प्लेसोबत 1.4 गिगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर दिला गेलाय. यामध्ये एक जीबी रॅम उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा दिला गेलाय. 2000 मेगाहर्टझची बॅटरी आहे.
फोनची इंटर्नल मेमरी 4 जीबी आहे. ही मेमरी कार्डच्या साहाय्याने वाढवता येऊ शकते. एचटीसीचा हा फोनही अँन्ड्रॉईड 4.4.2 किटकॅट ऑपरेटींग सिस्टमवर आधारित आहे.
एचटीसी डिझायर 616 ची किंमत 16,900 रुपये तर वन (E8) ची किंमत 34,990 रुपये निर्धारित करण्यात आलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.