कॅलिफोर्निया : समुद्र पर्यटकांच्या अंगावर देवमासाने उडी मारली आणि सर्वांचा थरकाप उडाला, ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात घडली. कयाकमध्ये जेव्हा पर्यटक एकामागून एक निघाले होते.
तेव्हा देवमासाने कयाकवर उडी घेतली आणि काठावर थांबलेल्या पर्यटकांचा थरकाप उडाला, कयाक, कुठे आहेत कयाक? (कयाक- पर्यटकांची होडी), मात्र काही सेकंदानंतर कयाक दिसायला लागली.
देवमासाने पर्यटकांच्या छोट्या नावेवर बाजूलाच उडी मारली होती, त्यामुळे पर्यटक छोट्या नावेतून बाहेर फेकले गेले मात्र बचावले. ते देवमासाच्या खाली आले असते तर वाचले नसते.
कारण देवमासाचं वजन साधारणत: 50 टन असतं, आणि नियमानुसार देवमाशापासून 100 ते 200 मीटर दूर राहावं लागतं. पण या ठिकाणी देवमासाने एवढी उडी कशी मारली हा सर्वांना प्रश्न पडला आहे, ही दृश्य पाहण्यासारखी आहेत.
समुद्र पर्यटकांच्या अंगावर देवमासाची उडी
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.