मुंबई : भारतीय महिला आपल्या नवऱ्यापेक्षा स्मार्टफोनवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे वा गेम्स खेळण्याला अधिक प्राधान्य देत असल्याची माहिती एका रिसर्चमधून समोर आलीये.
मोबाईल मार्केटिंग असोसिएशनने ही माहिती समोर आणलीये. या रिपोर्टनुसार, एका व्यक्ती दररोज तीन तास मोबाईलवर घालवतो. रिपोर्टच्या म्हणण्यानुसार, महिला पुरुषांच्या तुलनेत 80 टक्के अधिक वेळ फेसबुकवर घालवतात.
रिपोर्टनुसार, एक व्यक्ती दिवसातील तीन तास स्मार्टफोन वापरतो. हे प्रमाण गेल्या वर्षाच्या तुलनेत 55 टक्के अधिक आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सचा वापर यात मोठ्या प्रमाणावर होतो.
या रिपोर्टमधील माहितीनुसार, महिलांचे यूट्यूबवर व्हिडीओ पाहणे तसेच गेम्स खेळण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे. तसेच ऑनलाइन शॉपिंगसाठीही महिला मोबाईल अॅप्सचा वापर करतात.