खाण्याच्या आवडीवरुन ओळखा मुलींचा स्वभाव

जर तुम्हाला एखाद्या तरुणीबद्दल जाणून घ्यायचेय तर तिच्या खाण्यापिण्याच्या आवडी जाणून घ्या. 

Updated: Jan 25, 2016, 04:25 PM IST
खाण्याच्या आवडीवरुन ओळखा मुलींचा स्वभाव  title=

नवी दिल्ली : जर तुम्हाला एखाद्या तरुणीबद्दल जाणून घ्यायचेय तर तिच्या खाण्यापिण्याच्या आवडी जाणून घ्या. 

कॉफी पिणाऱ्या तरुणी रोमँटिक असतात. त्या आत्मनिर्भर असतात. मोठी स्वप्ने पाहतात. तसेच आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहतात.

अल्कोहल घेणाऱ्या तरुणी या अधिक चंचल असतात. त्यांना त्यांच्या मर्जीनुसार जगायला आवडते. 

ज्या मुलींना मिठाई खाणे आवडते अशा तरुणी ईमानदार आणि साध्या सरळ स्वभावाच्या असतात. यांना पटकन राग येतो. मात्र लगेच शांतही होतात. नातेसंबंधात प्रामाणिक असतात. 

चहा पिणाऱ्या तरुणी नम्र आणि लाजऱ्या स्वभावाच्या असतात. या अधिक महत्त्वाकांक्षी नसतात. लहान लहान गोष्टीतही या आनंद शोधतात. 

बटाट्याचे पदार्थ अधिक खाणाऱ्या मुली सरळ स्वभावाच्या असतात. स्वार्थी नसतात. या तरुणी आत्मनिर्भर असतात. मित्रांसाठी खर्च करायला यांना आवडतं. महत्त्वाकांक्षी असतात. 

नॉनवेज खाणाऱ्या मुली सगळ्यांमध्ये लगेच मिसळतात. यांचा सेंस ऑफ ह्यूमर चांगला असतो. शाकाहारी मुलींच्या तुलनेत या अधिक आक्रमक असतात. 

अधिक भात खाणाऱ्या मुली या चांगले मित्र होऊ शकतात. यांना प्रेमात दिखावा करायला आवडत नाही. तसेच खुलेपणाने प्रेम जाहीर करतात. 

चॉकलेट ज्या मुलींना आवडत त्यांचा स्वभाव नाजूक असतो. कला आणि सौंदर्य यांचे प्रतीक असतात. सरळ स्पष्टपणे बोलायला आवडतं.