मुंबई : आपल्या मित्रांना फोटो शेअर करणे एक चांगली गोष्टी आहे, कारण तुम्हाला त्यावर प्रतिक्रिया मिळतात, लाईक्स मिळण्याचं समाधान वेगळं असतं. मात्र फोटो शेअर करताना निश्चितच सावध राहणे गरजेचे आहे. फोटो जर चुकीच्या व्यक्तीच्या हाती पडले तर त्याचा वाईट वापर होणे नाकारता येत नाही.
मेल टुडे या दैनिकाने दिलेल्या बातमीनुसार काही लोकांचे फोटो सोशल वेबसाईटवरून घेऊन, थोडा बदल केल्यानंतर पॉर्न वेबसाईटसाठी वापरले जातात. मुलींच्या फेसबुक पेजवरून फोटो घेतल्यानंतर हे फोटो अशा साईटसना पोहोचवले जात आहेत.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फेसबुकवरील ४० टक्के मुलींच्या फेसबुक फोटोंसोबत असं केलं जात आहे. सुंदर मुलींच्या फोटोंचा वापर करून लोकांना चॅट करण्यासाठी आमीष देण्यात येतं.
जर फोटो सुंदर असेल, तर पॉर्न वेबसाईटच्या पेजला व्हायरल करण्यासाठी मदत घेण्यात येते. अशा चॅटसाठी लोकांकडून पैसेही घेतले जातात.
अशी कोणतीही परिस्थिती ओढवू नये म्हणून फेसबुकवर फोटो शेअर करताना, प्रायव्हसीच्या जागी पब्लिक स्टेटस करू नये, फक्त आपल्या मित्रांसाठीच ते ठेवावेत.