www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.
येत्या 5 मेपासून ऑनलाइन पोलीस भरतीचे अर्ज मागविले जाणार असून, 25 मेपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. पोलीस भरतीसाठी यंदापासून उमेदवारांना परीक्षा शुल्क दीडशे रुपयांवरून सव्वाशे रुपये येणार आहे.
कोण आहेत पात्र उमेदवार
शिपाईपदासाठी सर्वसाधारण, महिला, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल यांच्यासाठी भरतीत आरक्षण आहे. 30 एप्रिलपर्यंत 18 वर्षे पूर्ण असणारे विद्यार्थी त्यासाठी पात्र ठरतील.
पात्रता चाचणी आणि परीक्षा
> भरतीसाठी किमान बारावी उत्तीर्ण ही पात्रता ठेवण्यात आली आहे.
> शारीरिक क्षमतेत महिलांसाठी 155 सेंटिमीटर, तर पुरुषांसाठी 165 सेंटिमीटर किमान उंची असावी. पुरुषांसाठी 79 सेंटिमीटरहून जास्त छाती
> बॅण्ड पथकातील भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना किमान बॅण्डच्या वाद्याबाबत माहिती आणि वाजविण्याचा अनुभव असावा.
ऑनलाइन अर्ज करा, अधिक माहिती - http://www.mahapolice.gov.in/ वर
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.