'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'नेट न्यूट्रॅलिटी' महत्त्वाची - झुकरबर्ग

'नेट न्यूट्रॅलिटी' आणि 'इंटरनेट डॉट ओआरजी' याविषयी सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानंही या वादात उडी घेतलीय. 

Updated: Apr 17, 2015, 01:10 PM IST
'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'नेट न्यूट्रॅलिटी' महत्त्वाची - झुकरबर्ग title=

मुंबई : 'नेट न्यूट्रॅलिटी' आणि 'इंटरनेट डॉट ओआरजी' याविषयी सध्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत. याच दरम्यान फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग यानंही या वादात उडी घेतलीय. 

'फ्लिपकार्ट'नं 'एअरटेल झीरो'शी फारकत घेऊन 'नेट न्यूट्रॅलिटी'ला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केल्यानंतर आता मार्क झुकरबर्गनंही आपली मतं मांडलीत. 

'इंटरनेट डॉट ओआरजी'च्या माध्यमातून अनेक विकसनशील देशांतील अनेक अॅप्लिकेशन फ्रीमध्ये वापरण्याची सुविधा देत आहेत. झुकरबर्गनं फेसबुकवर एक कमेंट टाकलीय. यात त्यानं 'नेट न्यूट्रॅलिटी गरजेची आहे आणि याला इंटरनेट डॉट ओरआरजी'सारख्या झिरो रिटिंग प्रोग्रामसोबत चालवलं जाऊ शकतं' असं म्हटलंय. 

फेसबुकच्या सीईओची ही कमेंट सध्या भारतात सुरू असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीच्या बाबतीत जोडून पाहिलं जात आहे.

एक प्रोडक्ट म्हणून 'इंटरनेट डॉट ओआरजी' आणि 'एअरटेल झीरो' दोन्ही वेगवेगळे असले तरी दोघांमुळेही काही अॅप्सला फ्री वापरण्याची सूट मिळते. काही ठराविक अॅप्सला फ्री करण्याची सुविधा देणं हे 'नेट न्यूट्रॅलिटी'च्या विरुद्ध मानलं जातंय. कारण, कोणत्याही अॅपच्या वापराचा इंटरनेट खर्च सारखाच असतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.