खुशखबर! श्याओमीनं भारतात कमी केले Mi4चे दर

उत्तम तंत्रज्ञान आणि हटके असलेला स्मार्टफोन घेण्याची इच्छा असेल तर एक आनंदाची बातमी आहे. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी श्याओमीनं भारतामध्ये आपल्या फ्लॅगशिप मॉडेल Mi4च्या किमतीत खूप घट केलीय. नव्या किमती गुरूवारपासून लागू झाल्या आहेत.

Updated: Apr 16, 2015, 09:59 PM IST
खुशखबर! श्याओमीनं भारतात कमी केले Mi4चे दर title=

मुंबई: उत्तम तंत्रज्ञान आणि हटके असलेला स्मार्टफोन घेण्याची इच्छा असेल तर एक आनंदाची बातमी आहे. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी श्याओमीनं भारतामध्ये आपल्या फ्लॅगशिप मॉडेल Mi4च्या किमतीत खूप घट केलीय. नव्या किमती गुरूवारपासून लागू झाल्या आहेत.

कंपनीनं स्मार्टफोनच्या 16GB मॉडेलची किंमत 2 हजारानं कमी केलीय. पहिले Mi4चं 16जीबी मॉडेल 19,999 रुपयात यायचा तर आता 17,999 रुपयांना हा फोन मिळेल. 

याचप्रमाणे 64जीबी मॉडेलची किंमत पण 23,999 रुपयांनी कमी होत 21,999 रुपये झालीय. विशेष म्हणजे ही सूट कोणताही फेस्टिव्ह सिझन न पाहता देण्यात आलीय. 

श्याओमी 23 एप्रिलला आपला नवा फोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन कसा असेल याबद्दल माहिती नसली तरी हा फोन Mi4च्या दराच्या रेंजमध्येच लॉन्च होईल. 

Xiaomi Mi4 चे फीचर्स -
डिस्प्ले: 5" (1080x1920 pixels)
ओएस: अँड्रॉयड 4.4.3 (किटकॅट)
चिपसेट: Qualcomm MSM8974AC Snapdragon 801
प्रोसेसर: Quad-core 2.5 GHz Krait 400
मेमरी: 16/64 GB इंटरनल
रॅम: 3 GB
कॅमरा: 13 MP रियर, ऑटो फ्लॅश, 8 MP फ्रंट
बॅटरी: 3080 mAh

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.