या वर्षात लग्नासाठी आहेत ६४ मुहूर्त

यंदाच्या वर्षी मे अथवा जूनमध्ये लग्न करण्याचा विचार आहे तर दोन महिन्यात केवळ प्रत्येकी दोन मुहूर्त आहेत. 

Updated: Mar 14, 2016, 11:55 AM IST
या वर्षात लग्नासाठी आहेत ६४ मुहूर्त title=

मुंबई : यंदाच्या वर्षी मे अथवा जूनमध्ये लग्न करण्याचा विचार आहे तर दोन महिन्यात केवळ प्रत्येकी दोन मुहूर्त आहेत. 

मार्च महिन्यात ११ तारखेनंतर एक महिना लग्नाचे कोणतेही मुहूर्त असणार नाहीत. एप्रिल महिन्यात लग्नासाठी १६ ते २९ तारखेपर्यंत मुहूर्त आहेत. मे आणि जून महिन्यात मात्र प्रत्येकी दोन-दोन मुहूर्त आहेत. 

पंचांगानुसार, एप्रिल महिन्यात लग्नासाठी 16,17,18,19, 20, 22, 24, 25, 26, 27, 28, 29 इतके मुहर्त आहेत. त्यानंतर जुलैमध्ये 1,4,8,9,10,11,13,14, नोव्हेंबरमध्ये 21,23,24,30, डिसेंबरमध्ये 1,3, 8, 9,12,13, मेमध्ये 1,4 आणि जूनमध्ये 27,29 इतके मुहूर्त आहेत.